कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांच्या सेवेत, शनिवार-रविवार वाहतूक राहणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनवणारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प उद्यापासून सेवेत दाखल होत आहे. उद्य्‘ाा सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका अधिकाऱयांच्या उपस्थितीत वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, मुंबईकरांना या मार्गिकेवरून प्रत्यक्षात मंगळवार, 12 मार्चपासून सकाळी 8 वाजल्यापासून प्रवास करता येणार आहे, तर शनिवारी आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत दररोज वाढणाऱया शेकडो वाहनांमुळे प्रचंड वाहतूक काsंडी होत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही डोकेदुखी ठरत आहे. दक्षिण मुंबईत याची तीव्रता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंत 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्याचा निर्धार पालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. ऑक्टोबर 2018 पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील अंतर वाढवण्याची मागणी केल्यामुळे 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत वाढवण्यात आले. यामुळे कामात वाढ झाली. शिवाय कोरोनाचा बसलेला फटका, न्यायालयीन कार्यवाहीत गेलेला वेळ यामुळे कोस्टल रोडची नोव्हेंबर 2023ची डेडलाइन आता मे 2024 पर्यंत गेली आहे. मात्र कोस्टल रोडचे एकूण 86 टक्के काम पूर्ण झाल्यामुळे सद्यस्थितीत कोस्टल रोडची एक लेन सुरू करण्यात येणार आहे.

कोस्टल रोडमुळे मिळणार अशा सुविधा

– कोस्टल रोडला समांतर अशी 7.5 किमी लांबीची फुटपाथ बांधण्यात येणार आहे. ही फुटपाथ 20 मीटर रुंद राहणार आहे. प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी फेसपर्यंत हा पदपथ असेल. यावर सायकल ट्रकही असेल.
– भूमिगत पार्ंकगमध्ये अमर सन्स येथे – 256, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली – 1,200 तर वरळी सी फेस येथे – 400 वाहन क्षमता. मार्गावर वेग मर्यादा ताशी 80 ते 100 किमी.
– याठिकाणी एक फुलपाखरु उद्यानासह उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार असून लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ फळी, झोके यासारख्या बाबीही असणार आहेत.
– बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.
– कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहेत. हा मार्ग वरळी सी लिंकला जोडणार असून वेळेची बचत होणार आहे.
-तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह प्रवासादरम्यान दोन किलोमीटरचा बोगदा आहे. हा बोगदा समुद्राखालून गेलेला आहे. सध्या हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे.