
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही तिन्ही द्वीप आता अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद आणि स्वराज या नावांनी ओळखली जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले. पोर्ट ब्लेअरमध्ये 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम तिरंगा फडकावला होता. त्याला आज 75 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी द्वीपांच्या नामांतराची घोषणा केली.
पंतप्रधानांनी सेल्युलर जेलमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या काळकोठडीत ठेवण्यात आले होते. तिथे मोदी काही वेळ ध्यानस्थही बसले. त्याआधी त्सुनामीतील मृतांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली.




























































