पीएमसी बँकेतून आता 50 हजार रुपये काढता येणार

478

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यावरून तब्बल 50 हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा 40 हजार रुपयांवरून 50 हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे 78 टक्के ग्राहकांना खात्यावरील सर्व पैसे काढता येणार आहेत.

एचडीआयएलला मोठय़ा प्रमाणात कर्ज दिल्याने पीएमसी बँक आर्थिक अडचणीत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने 23 सप्टेंबर रोजी बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या खात्यावरून केवळ एक हजार रुपये काढता येत होते. त्यानंतर बँकेने वेळोवेळी पैसे काढण्याची मर्यादा वाढवत दहा हजार, पंचवीस हजार, चाळीस हजार अशी केली होती. बँकेने आज चौथ्यांदा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. दरम्यान, ठेवीदारांना बँकेत जाऊन पैसे काढण्याबरोबरच एटीएम कार्डनेही पैसे काढण्याची सुविधा दिली आहे.

आरबीआयसमोर ठेवीदारांची निदर्शने; नऊ जण ताब्यात

पीएमसी बँकेत ठेवलेली आपल्या कष्टाची कमाई तत्काळ मिळावी म्हणून आज सकाळी ठेवीदारांनी वाद्रे-कुर्ला सुंकालतील आईबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ठेवीदार अक्रमक झाल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले.

भिवंडीत 74 वर्षीय ऍण्ड्रय़ू लोबो यांचा मृत्यू 

पीएमसी बँक घोटाळ्यामुळे  आज आणखी एका ठेवीदाराचा बळी गेला. भिवंडीच्या कशेळी येथील 74 वर्षीय ऍण्ड्रय़ू लोबो यांचे पीएमसी बँकेत 35 लाख रुपये आहेत. आतापर्यंत या पैशाच्या व्याजावर त्यांचा दैनंदिन खर्च चालत होता. मात्र बँकेवर निर्बंध आल्याने त्यांना पैसे मिळणे बंद झाले होते. त्यातच लोबो अजारी पडल्याने आपल्या दवापाण्याचा, उपचाराचा खर्च कसा भागवायचा, हक्काचे पैसे कधी मिळणार या विवंचनेत ते होते. त्यातच आज त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या