वित्तीय संकटात सापडलेल्या बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेचा घोटाळा नुकताच प्रकाशात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधामुळे बॅंकेतील ठेवीदार त्रस्त झालेले आहेत. पी.एम.सी. बॅंकेप्रमाणेच यापूर्वी सिटी को.ऑप. बॅंक, मराठा सहकारी बॅंक, सी.के.पी. बॅंक या सहकारी बॅंकांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेही सर्वसामान्य ठेवीदार भरडले गेले आहेत. अशा ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत केली.

यातील बहुतांश ठेवीदार हे निवृत्तीवेतनधारक असून त्यांनी आपली जन्मभराची पुंजी या बॅंकेत ठेवली आहे व त्या व्याजावर ते जगत आहेत. अशा ठेवीदारांना व्याजही मिळणे दुरापास्त झाले आहे. यास्तव रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणलेल्या महाराष्ट्रातील वित्तीय संस्थांतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी विधान परिषदेत शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली आहे.

शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संस्थांमध्ये बदली कामगारांवर होणारा अन्याय दूर करा
शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 19 रुग्णालय संस्थांमध्ये 29 दिवस तत्त्वावर गेली 20 वर्षे बदली कामगार म्हणून कार्यरत असलेल्या 925 कर्मचाऱ्यांपैकी 263 बदली कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधनाने प्रस्ताव सादर केला आहे. यात जे.जे., सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयाचे कर्मचारी असून यांना कायम केल्याने राज्याच्या तिजोरीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे दिली.

संचालनालयाच्या 11 जुलै रोजीच्या पत्रानुसार गठीत समितीने पात्र ठरवल्याप्रमाणे संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी 30 नोव्हेंबर रोजी, सचिव, वैद्यकीय शिक्षण क औषधी द्रव्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. या कामगारांना नियमित केल्याने कोणताही आर्थिक भार शासनाच्या तिजोरीकर पडणार नाही. गेली 20 वर्षे हे कर्मचारी 29 दिवसांच्या बदली सेकेत असल्याने कायम प्रचंड मानसिक तणाकात असतात. तरी सदरच्या प्रलंबित प्रस्ताकास तांतडीने मान्यता देण्यात याकी, अशी मागणी त्यांनी केली.

रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची बदली करणार
रायगड येथील जिल्हा रुग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या नॅशनल रुरल हेल्थ मिशनमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे प्राथमिकपणे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची तडकाफडकी बदली करून त्यांना प्रशासकीय पदभार न देता त्यांची इतर पदावर नियुक्ती केली जाईल. त्यांच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्हय़ात आरोग्यसेवेविषयीच्या योजना वेळोवेळी प्रयत्न करूनदेखील योग्य रीतीने राबविल्या जात नाहीत. एनआरएचएमअंतर्गत कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून जिल्हय़ातील डॉक्टरांची नियुक्ती न करता बाहेरच्या जिल्हय़ांतील डॉक्टरांची नेमणूक करणे याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री जयंत पाटील यांनी एनआरएचएमअंतर्गत विविध कामांमध्ये व खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याचे स्पष्ट करत डॉ. अजित गवळी यांची तातडीने बदली करून त्यांच्या कारभाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.