पीएमसी बँकेच्या संचालकासह अन्य दोघांना अटक

पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी आणखी तिघांना अटक केली. त्यात बँकेचे संचालक जसविंदर सिंग बॅनवेट यांच्यासह अन्य दोघे खासगी कंपनीशी संबंधित आहेत. जसविंदर यांच्यासह यार्डी प्रभू कन्सलटंट ऍण्ड वॅल्युअर्स प्रा. लि. चे विश्वनाथ प्रभू आणि श्रीपाद जेरे यांचा समावेश आहे. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात या तिघांची नावे समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, परंतु चौकशीत तिघांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. जसविंदर हे बँकेच्या संचालकाव्यतिरिक्त बँकेच्या कर्ज, गुंतवणूक आणि कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे बँकेने एचडीआयएलला दिलेल्या कर्जासंबंधी जसविंदर यांची चौकशी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या