ईडीच्या लपवाछपवीला न्यायालयाची चपराक, उपेंच्या प्रकरणात मूळ कागदपत्रे तातडीने सादर करण्याचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कारनामे उघडकीस आणणारे नागपूरचे वकील सतीश उके यांच्याविरोधातील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीला विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. उके यांच्या अटकेवेळी तक्रारीसोबत जोडलेली मूळ कागदपत्रे तातडीने सादर करण्याचा स्पष्ट आदेश विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिला आहे. या आदेशामुळे ईडीच्या लपवाछपवीला चपराक बसली आहे.

सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात पैद असलेले सतीश उके यांना काही दिवसांपूर्वी अचानक दुसऱया एका गुह्याच्या चौकशीसाठी नागपूरला नेण्यात आले होते. त्यावेळी तपास यंत्रणेच्या अधिकाऱयांनी बनवाबनवी केल्याचा आरोप उके यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आता ईडीची मूळ कागदपत्रांशी संबंधित लपवाछपवी विशेष सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यासंदर्भात त्यांचे वकील रवी जाधव यांनी रीतसर अर्ज केला. त्याची गंभीर दखल घेत विशेष न्यायालयाने ईडीला उके यांच्याविरोधातील तक्रारीसोबत जोडलेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील आरोपांशी संबंधित मूळ कागदपत्रे तातडीने सादर करण्याचा आदेश दिला.