
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदीला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी लंडन कोर्टात हिंदुस्थानाने याचिका केली होती. मात्र माझे मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही. त्यामुळे हिंदुस्थानात माझे र्पत्यार्पण करू नका, अशी याचिका मोदीने केली होती, मात्र आत्महत्या करण्याएवढे मोदीचे मानसिक संतुलन बिघडलेले नाही. त्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असा निकाल देत मोदीची याचिका लंडनच्या वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. नीरव मोदीने कर्जाच्या बहाण्याने पीएनबी बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावला आहे.




























































