शेजारणीचं प्रेम तरुणाला महागात पडलं, प्रेयसीनेच पाजला विषारी चहा

file photo

शेजारणीच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणाला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. प्रेयसीने दिलेला विषारी चहा प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना बिहार येथील मुंगेर येथे घडली आहे. बिहारमधील लालदरबाजा ओपी या परिसरातील गीताबाबू रोड सहनी टोला परिसरात राहणारा रामकुमार सहनी या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामकुमारचे लग्न होऊन सात वर्षे झाली होती.

लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर तो त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तो तिला भेटायला तिच्या घरी जात असे. तसेच प्रेयसी आणि तिचे कुटुंबीय रामकुमारवर लग्न करण्यासाठी दबाव आणत असत.

सात वर्षांपूर्वी रामकुमारचे जानकी देवी हिच्यासोबत लग्न झाले असून त्यांना तीन मुलंही आहेत. त्यांचा सुखी संसार सुरू असतानाच गेल्या काही महिन्यांपासून त्याचे प्रेम शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जडले. तो रोज तिच्या घरी जात असे. यावरून त्याची पत्नी जानकीदेवीसोबत त्याचे भांडणही होत असे.

एके दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजता रामकुमारच्या प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. तिला भेटायला गेल्यानंतर एक तासाने रामकुमार घरी आला. घरी आल्यावर त्याने पत्नी जानकीला त्या तरुणीने चहामध्ये विष घालून मला प्यायला दिले असे सांगितले. तसेच त्याच्या पाकिटात विषाचे पॅकेटही सापडले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्वरित रामकुमारला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी त्याची पत्नी जानकीने तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर रामकुमारची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या