
टिडब्ल्यूजे असोसिएटस या वित्तीय कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूणात तक्रार दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून टिडब्ल्यूजे असोसिएटस कंपनीत गुंतवणूक करून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.त्यामुळे टिब्ल्युजे असोसिअटसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टीडब्ल्यूजे असोसिएटसचे मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, सिद्धेश कदम आणि संकेश घाग या चौघांविरोधात 19 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कामथे येथील प्रतिक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार टीडब्ल्यूजे असोसिएटस वर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे.ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुंतवणूकदारांना 1 लाखावर प्रतिमाह 3 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजाचे आमीष दाखविण्यात आले. याला भुलून अनेकांनी या कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली. सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, शिक्षक, व्यापारी तर काही उद्योजकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले. 2018 पासून ही कंपनी सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला, पण गेले सहा महिने गुंतवणूकदारांच्या खात्यात व्याज मिळणे बंद झाले आहे. शिवाय कर्मचार्यांचे वेतनही रखडले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे.