शिंदे गटाच्या कमलेश राय यांना अटक, बिल्डरकडे मागितली 50 लाखांची खंडणी

शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली.

अंधेरी पूर्व परिसरात एक बांधकामाची साइट सुरू आहे. त्या व्यावसायिकाकडे राय याने 50 लाखांची खंडणी मागितली असा त्यांच्यावर आरोप आहे. त्याबाबत त्या व्यावसायिकाच्या साइटवरील एकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्या तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. एमआयडीसी पोलिसांनी राय विरोधात गुन्हा नोंद केला. त्याना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.