गुजरातमधून सटकलेला ‘उडता कबूतर’ अंधेरीत सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गुजरातच्या साबरमती सेन्ट्रल कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगणारा कैदी सिराज खान मसकुर खान पठाण ऊर्फ ‘उडता कबूतर’ हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-3ने अंधेरीत आलेल्या सिराजला पकडून पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्या आरोपीला 19 एप्रिल रोजी  अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस उपचारासाठी घेऊन निघाले होते.तेव्हा तो पसार झाला. तो अंधेरी  मेट्रो स्टेशनजवळ येणार असल्याची खबर मिऴताच प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निपुंबे, उपनिरीक्षक उघडे,अंमलदार प्रमोद सकपाळ, दीपक कोळी, मंगेश शिंदे, भास्कर गायकवाड, अरविंद करंजे या पथकाने त्याला सापळा रचून  पकडले.