
गायिकेच्या चोरी झालेल्या आयफोनमधून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध करू, अशी धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागणाऱया मोबाईल रिपेअरला अखेर बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. दानिश मोमीन अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार गायिकेचा जुलै महिन्यात आयफोन चोरी झाला होता. गेल्या महिन्यात तिला तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून काही आक्षेपार्ह व्हिडीओ आले. ते व्हिडीओ तिचे असल्याने गायिकेला धक्का बसला. त्यानंतर एका नंबरवरून तिला पह्न आला. पाच लाख रुपये न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली. व्हिडीओ व्हायरल झाल्यास समाजात बदनामी होईल त्या भीतीपायी गायिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. अखेर त्रासाला पंटाळून गायिकेने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गायिकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विवेक तांबे आणि पथकाने तपास सुरू केला. खंडणी मागणाऱयाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी दीड महिना फिल्डिंग लावली. पोलिसांनी डेटाचे विश्लेषण केले. अखेर पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने मालवणी येथून अन्सारीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अन्सारीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले आहे.




























































