मालवणीमध्ये पोलिसाला मारहाण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तडीपार आरोपीने पोलिसाला मारहाण केल्याची घटना मालाडच्या मालवणी येथे घडली आहे. मारहाणप्रकरणी अली अहमद मोईनुद्दीन कुरेशी ऊर्फ लंगडाला मालवणी पोलिसांनी अटक केली.

मालवणी पोलीस ठाण्यात सचिन वळतकर हे डय़ुटीला आहे. गुरुवारी रात्री ते रात्रीच्या वेळी गस्त करत होते. गस्तीदरम्यान मालवणीच्या गेट नंबर सहाजवळ अली हा दिसला. त्याच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने सचिन याच्यावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अलीला पकडले. अली हा सराईत गुन्हेगार असून त्याला मालवणी पोलिसांनी तडीपार केले आहे. पोलिसाला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अलीविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.