
अंधेरी येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा अंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून तरुणीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज उैर्फ मोहंमद गुलाब शेख या दलालास अटक केली.
सर्फराज हा ग्राहकाच्या मागणीनुसार तरुणी वेश्या व्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंबोली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सर्फराजला संपर्क साधला. त्यानंतर सर्फराजने काही तरुणीचे फोटो ऑनलाइन पाठवले. त्यानंतर सर्फराज हा तरुणी सोबत आला. पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी सर्फराजला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या सोबत आलेल्या तरुणीची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी सर्फराज विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.