उत्तर प्रदेशमध्ये पोलीस शिपायाकडून अधिकार्‍याला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका पोलीस शिपायाने क्षुल्लक कारणावरून पोलीस अधिकार्‍याला मारहाण केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने पोलीस शिपायाला निलंबीत केले आहे.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एका चौकात पोलिसांची ड्युटी होती. तिथे पोलीस अधिकारी रमेश चौहान आणि शिपाई राम आसरे कार्यरत होते. या चौकात वाहनांची चेकिंग सुरू होती. यावेळी अधिकारी रमेश चौहान आणि राम आसरे यांच्यात वाद झाला. तेव्हा राम आसरे हातातील काठीने चौहान यांना मारहाण केली. नंतर बाकीचे पोलीस राम आसरेला थांबवण्यासाठी पुढे आले आणि आसरेकडून काठी हिसकावून घेतली. राम आसरेचा राग शांत झाला नव्हता. त्याने चौहान यांना कानाखाली मारण्यास सुरूवात केली.

नंतर रमेश चौहान यांनी राम आसरे विरोधात तक्रार केली. तपास आणि चौकशीनंतर पोलीस शिपाई राम आसरेला निलंबीत करण्यात आले.