पोलिसांचा डीव्हीआर गायब करून पुरावे नष्ट करणे एवढे सोपे नाही – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब केला तरी बॅकअप मेन सर्व्हरला आहे. त्यामुळे ऑण्टिलिया स्फोटक व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील पुरावे नष्ट करणे एवढे सोपे नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खासगी सीसीटीव्हींचा डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहे, पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करून त्यातील पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच सीसीटीव्ही यंत्रणा बसविताना करून ठेवली आहे, असे फडणवीस म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी होण्यापेक्षा वाझे प्रकरणात महाराष्ट्र व पोलिसांची अधिक बदनामी झाल्याचे त्यांनी सांगितले.

फोन टॅपिंग प्रकरणाची मी केवळ दोन पाने दिली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अख्खा अहवालच पह्डला. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल पेंद्रीय गृह मंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. एनआयए चौकशीत वाझे काय बोलणार याची त्यांना चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले.