वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणार ‘पोलीस मित्र’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, वसई

वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आता ‘पोलीस मित्र’ही मैदानात उतरणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल दहा हजार जणांनी ‘पोलीस मित्र’ होण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये जवळपास दोन हजार महिलांसह महाविद्यायलीन तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या फौजफाटय़ामुळे वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीबरोबरच अन्य गुन्हेगारी कृत्यांना लगाम बसणार आहे.

वसईतील सर्क पोलीस ठाण्यांना एका महिन्यात दहा हजार ‘पोलीस मित्र’ बनवण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिले होते. सध्या अडीच हजार ‘पोलीस मित्र’ पोलिसांना कामात मदत करत आहेत. शहरात काढत जाणारी लोकसंख्या क पर्यायाने काढणारे गुन्हे लक्षात घेता त्या तुलनेत सध्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यावर तोडगा म्हणून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात राबवून पोलिसांच्या कामात चांगल्या नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन करण्याचे ठरकले होते. त्यादृष्टीने या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले होते. त्यानुसार तब्बल दहा हजार तरुणांनी याला प्रतिसाद देत ‘पोलीस मित्र’ होण्याचा निर्णय घेतला आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुरुवारी या सर्व ‘पोलीस मित्रां’ची कार्यशाळा झाली. त्याकेळी उपस्थित ‘पोलीस मित्रां’ना अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांच्या विविध कामात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी ही संकल्पना राबवली जात असते. सध्या 10250 ‘पोलीस मित्रां’ची नोंदणी झाली आहे. यांची संख्या वाढवणार आहोत. त्यांच्याशी व्हॉट्सऍप ग्रूपच्या माध्यमातून पोलीस संपर्कात राहणार आहेत.
– विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक