धक्कादायक… पुण्यात महिलेला गुंगीचे औषध पाजून बलात्कार, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

प्रातिनिधिक फोटो

शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून एका पोलीस निरीक्षकानेच महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठ पोलीस लाईनमध्ये घडली आहे. संबंधित पोलीस निरीक्षक सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकात माने पुण्यात कार्यरत असताना त्यांची फिर्यादी महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर घर दाखविण्याच्या बहाण्याने चंद्रकांत यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलीस लाईनमध्ये नेले होते. त्याठिकाणी त्याने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून महिलेवर अत्याचार करीत फोटो आणि व्हिडिओ रेकॉडिंग केले. त्यानंतर व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन चंद्रकातने महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. तुझ्यासोबत लग्न करेन अशी बतावणी करून वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी चंद्रकातने फिर्यादी महिलेला दिली होती. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोदंविली. चंद्रकात सध्या सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत.

फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करून धमकी दिल्याप्रकरणी सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तपास सुरू असून न्यायालयाकडून त्यांना अंतिरम जामीन देण्यात आला आहे.
– संदीप जोरे, सहायक पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या