सोलापुरात पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सोलापूर

रत्नागिरी-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी दिलेल्या शेतकऱयांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोलापुरात काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी तीन ठिकाणी लाठीहल्ला केला असे किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली सांगली व सोलापूर जिह्यातील सुमारे दोन ते तीन हजार शेतकरी सोलापुरात दाखल झाले हेते. सांगलीचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानावर निवेदन देण्यासाठी हे शेतकरी येत असतानाच विजापूर रोडवरील पत्रकार भवनजवळ मोर्चा अडविण्यात येऊन पोलिसांनी लाठीमार केला.