लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

631
bribe

देशी दारू व्यावसायिकाकडून सातशे रुपयाची लाच स्वीकारताना मसुरे दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात ताब्यात घेतले.

दरम्यान, मसुरे दुरक्षेत्रातच घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कार्यवाही सुरू होती. मात्र लाचलुचपत अथवा पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही स्वरूपात माहिती पत्रकारांना देण्यात आली नव्हती. यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ का ? असा सवाल उपस्थित केला जात होता.

बागायत येथील देशी दारू व्यावसायिकडून हप्त्यापोटी सातशे रुपये रक्कम ठरविण्यात आली होती. यापूर्वी यातील काही हप्ते संशयित नांदोसकर यांनी घेतले होते. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून व्यवसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ही करवाई करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता कारवाई झाली, मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत याबाबत माहिती देण्यास गुप्तता पाळली जात होती. एकूणच नांदोसकरांच्या बाबत आणखी काही तक्रारी प्राप्त झाल्या. आणखी काही जणांकडून हजारोंची रक्कम त्यांनी हप्त्यापोटी घेतली अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्यानुसार नांदोसकर यांची सखोल चौकशी सुरू होती

आपली प्रतिक्रिया द्या