पोलिसांची गस्त आणखी तगडी होणार, महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातनिधिक फोटो

>> आशीष बनसोडे

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी आता पोलिसांची तगडी गस्त राहणार आहे. कारण पोलिसांना तशा ठिकाणी ठरावीक वेळेनंतर गस्त घालावीच लागणार आहे. ही गस्त प्रभावी रहावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालून नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शहरात क्यूआर कोड प्रणाली इनअॅक्शन करण्यात आली आहे.

सध्याचा जमाना ऑनलाइनचा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलानेही आपले काम काळानुरूप अपडेट ठेवण्यासाठी ऑनलाइनची मदत घेतली आहे. मुंबई पोलीस अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेतच, पण पोलीस ठाणे स्तरावरील कामदेखील अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीचा आधार घेण्यात आला आहे.

या प्रणालीमुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारी संवेदनशील ठिकाणे, प्रार्थना स्थळे, निर्जन जागा या ठिकाणी  ठरावीक वेळेनंतर पोलिसांना सतत गस्त ठेवावी लागणार आहे. याबाबतीत पुठलाही टंगळमंगळपणा किंवा दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्या ठिकाणी संबंधित अंमलदार तसेच अधिकाऱयांनी भेट दिली की नाही याची क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंद घेण्यात येणार आहे.  या प्रणालीनुसार सध्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱया पोलीस ठाण्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. तर मध्य व उत्तर प्रादेशिक विभागात लवकरच ही प्रणाली कार्यरत होणार आहे.

क्यूआर कोड प्रणालीमुळे आमचे काम अधिक गतिमान व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी ठरणार आहे.  लवकरच संपूर्ण शहरात या प्रणालीनुसार काम सुरू होणार असून याचा पोलीस दल व नागरिकांना खूप फायदा होणार आहे. 

– चैतन्य, पोलीस उपायुक्त

काय करावे लागणार 

आधी पोलीस संबंधित ठिकाणी भेट देऊन त्याची डायरीत नोंद करत होते, परंतु आता तसे करावे लागणार नाही. पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यावर अंमलदार किंवा अधिकाऱयास तो क्यूआर कोड आपल्या मोबाईलवर स्पॅन करावा लागणार. क्यूआर कोड स्पॅन केल्यास डय़ुटीवर असलेले अंमलदार किंवा अधिकाऱयाने तेथे भेट दिल्याचे ऑनलाइन स्पष्ट होणार आहे. त्याची अपर पोलीस आयुक्तांमार्फत नोंद  घेण्यात येणार आहे.