कौसडीत वेशांतर करुन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वेषांतर केलेले पोलीस

सामना प्रतिनिधी । परभणी

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील आठवडी बाजारामध्ये जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करत टाकलेल्या धाडीत तब्बल सहा जणांना तीन मोबाईल संच, जुगार साहित्यासह रोख ३ हजार रुपये जप्त केले.

कौसडी गावातील आवठडी बाजारामध्ये मुंबई कल्याण नावाचा जुगार राजरोसपणे घेतला जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. जुगार अड्ड्यावर टाकलेली धाड यशस्वी होण्यासाठी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनाही वेशांतर करण्यास सांगीतले. त्यावरुन या पथकामध्ये कोणी शेतकरी, ऊसतोड कामगार, व्यापारी, कीर्तनकार आणि गोंधळी असे वेशांतर केलेले पोलीस एका खाजगी वाहनाने प्रवास करत कौसडी येथील आठवडी बाजारात जुगार घेणाऱ्यांचा शोध घेतला. कौसडी गावातील आरोग्य वेंâद्रासमोर आणि मारोती मंदिरासमोर सार्वजनिक ठिकाणी या वेशांतर केलेल्या पोलिसांनी धाडी टाकल्या. या धाडीमध्ये रमेश मोरे, तुळशीराम देशमुख, साहेबराव देशमुख, विनोद शंख, लक्ष्मण दगडु आणि गजानन या मटकाबुकी मालकासह ताब्यात घेवून त्यांच्याकडून तीन मोबाईल संच, जुगार साहित्यासह रोख ३ हजार रुपये जप्त केले आणि पोलीस हवालदार शिवाजी भोसले यांनी बोरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

दरम्यान, ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, बाळासाहेब तुपसमुंदे, हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धुतराज, भगवान भुसारे, सय्यद मोईन, हरि खुपसे, सय्यद मोबीन यांनी कामगिरी बजावली.