परंडा तालूक्यातील अनाळ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण

677

परंडा तालुक्यातील अंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांना कर्तव्य बजावत असताना अनाळा येथील दुकानदाराकडून मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याबाबत अंभी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह अनाळा येथे गेले होते. अनाळा येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची व दुकानासमोर नागरिकांची गर्दी असल्याने पालवे यांनी रस्त्यावरील वाहने काढण्यास सांगितले. दुकानासमोरील रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले प्लास्टिक काढण्यास सांगितले असता दुकानदाराने हे तुमचे नेहमीच असते असे सांगत पालवे यांना धक्का दिला. त्यामुळे प्लास्टिकमध्ये पाय अडकून पालवे खाली पडले. यानंतर पालवे यांनी आरोपीला नेण्यासाठी पोलीस गाडी गाडीत बसलेले असता दोन जणांनी पोलीसांची गाडी अडवत पालवे यांना मारहाण केली. या प्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या