
जळकोट तालुक्यातील मौजे तिरुका गावाजवळील डोंगरगाव पाटीच्या समोर तिरुका गावाजवळील असणाऱ्या वाकानाजवळील कालव्यात उदगीर शहर पोलीस ठाण्यातील गाडीचा अपघात मंगळवारी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
जळकोट ते उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 50 लगत असलेल्या तिरूका गावाजवळील ही घटना घडली आहे. यात पोलीस कर्मचारी जमादार मच्छिंद्र वामन वर्टे यांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस कॉन्टेबल गोपाळ भालेराव हे गंभीर जखमी आहेत. यांच्यावर उदगीर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































