मनोज जरांगे यांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त करून परत येत असताना पोलीस वाहनाचा अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर

यवतमाळच्या शेंबाळापिंपरी येथे मराठा समाज बांधवासी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभा स्थळी पोलिसांना सोडून पुसद येथून वणीकडे परतत असलेल्या पोलीस वाहनाच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले.

दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी जवळ अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात वाहन चालक अजित पंधरे (40) हे किरकोळ जखमी झाला. यावेळी पोलीस वाहनात फक्त चालकच होते. घटनेची माहिती मिळतास दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

पोलिस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले. जखमी वाहन चालक अजित पंढरे हे किरकोळ जखमी झाले. औषध उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.