
पतीने बंडखोरी करत महानगरपालिका निवडणूक लढवीत असल्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने घर सोडल्याची चर्चा राज्यात गाजली होती. नागपुरातील माजी महापौर अर्चना डेहनकर आणि त्यांचे पती विनायक यांच्यातील हा राजकीय संघर्ष उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत कायम होता. विनायक डेहनकर यांनी उमेदवारी कायम असून ते भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद चिखले यांच्याविरोधात लढत आहेत. पत्नीने भाजपचे काम करावे, मी माझे काम करतो असे म्हणत विनायक डेहनकर यांनी निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यामुळे इतर लढतींपेक्षा डेहनकर काय चमत्कार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































