
देशात नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांचे उत्पन्न 2022-23 मध्ये तब्बल 223 टक्क्यांनी वाढले आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या नवीन अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमधील 5 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना गेल्या पाच वर्षात तीन निवडणुकीत केवळ 22 हजार मते मिळाली आहेत परंतु, त्यांचे उत्पन्न मात्र 2 हजार 316 कोटी रुपये आहे. यापैकी अवघ्या एका वर्षात या पक्षाचे उत्पन्ना 1158 कोटी रुपये आहे, असेही समोर आले आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, देशात एस 2 हजार 764 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. यापैकी 73 टक्क्यांहून अधिक पक्षांनी त्यांचे आर्थिक रेकॉर्ड सार्वजनिक केलेले नाहीत. तर 739 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांनी रेकॉर्ड सार्वजनिक केले आहेत. 2018 नंतर यापैकी चार पक्षांची नोंदणी झाली असून 2019-2024 दरम्यान या पक्षांनी दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत एकूण 17 उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना एकही उमेदवार जिंकता आला नाही. या पक्षांना सर्व पैसा हा देणग्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. हजारो कोटी रुपये मिळाल्यानंतर सुद्धा या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 744 पक्ष आहेत. दिल्ली 240, तामीळनाडू 230, महाराष्ट्र 216, बिहार 184, आंध्र प्रदेश 129, मध्य प्रदेश 107, हरियाणा 102, गुजरात 95, कर्नाटक 92, पंजाब 73, उत्तराखंड 40 आणि गोव्यात 12 पक्ष आहेत.
गुजरातमध्ये सर्वाधिक देणग्या मिळालेले पाच पक्ष
पक्ष मते देणगी
भारतीय राष्ट्रीय जनता पक्ष 11,496 957 कोटी
न्यू इंडिया युनायटेड पार्टी 9029 608 कोटी
सत्यवादी संरक्षक पक्ष 1042 416 कोटी
जन मन पार्टी 480 134 कोटी
सौराष्ट्र जनता पार्टी 140 200 कोटी