
चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात झालेल्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने हिंदुस्थानी संघाचा 227 धावांनी पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने चौथ्या डावात टीम इंडियापुढे विजयासाठी 420 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र हिंदुस्थानचा संघ अवघ्या 192 धावांमध्ये गारद झाला. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 3 आणि जोफ्रा आर्चर, डॉमिनिक बेस व बेन स्टोक्सने प्रत्येकी 1 बळी घेतले.
पाचव्या दिवशी टीम इंडियाने आपला दुसरा डाव 1 बाद 39 धावांवरून पुढे सुरू केला. चेन्नईत ब्रिस्बेन कसोटीची पुनरावृत्ती होण्याची आशा क्रीडाप्रेमींना होती, मात्र अँडरसन आणि लीचच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. रहाणे, सुंदर आणि नदीम यांना तर भोपळाही फोडता आला नाही. विराटने सर्वाधिक 72 तर गिलने 50 धावांची खेळी केली.
दरम्यान, टीम इंडियाच्या दारुण पराभवाला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होता. अर्थात विजयाचे श्रेय जसे कर्णधाराकडे जाते, तसेच पराभवाचेही खापर कर्णधारावरही फुटते. त्यामुळे तुम्हाला हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला कोहली जबाबदार वाटतो का? यासाठी आमच्या ट्विटर हँडलवरील पोलवर वोट करा…
#INDvENG हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला विराट कोहली जबाबदार आहे ?
— Saamana (@SaamanaOnline) February 9, 2021




























































