
आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरुवारी आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात एका निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
देबेन होरो (४५) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते नदुआर विधानसभा मतदारसंघात दुसरे मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘होरो यांची नियुक्ती डोलापाणी एल.पी. स्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक २३० वर करण्यात आली होती. आज सकाळी ते त्यांच्या अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले’.


























































