किरण बेदींना हटवा! पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुद्दुचेरीतील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एसडीए सरकार आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. केंद्र सरकारने किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरून हटवावे, या मागणीसाठी खुद्द मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी रविवारी सलग तिसऱया दिवशी राजभवनासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले.

नारायणसामी यांच्यासह पीसीसी अध्यक्ष ए. व्ही. सुब्रमण्यम, त्यांच्या सरकारमधील मंत्री, काँग्रेस आमदार, भाकप, माकप आणि व्हीसीकेच्या विविध समित्यांतील पदाधिकाऱयांनी आंदोलनात सहभाग घेतला. किरण बेदी संवैधानिक सरकारला काम करू देत नाहीत. त्या केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आमच्या कामात ढवळाढवळ करीत आहेत, असा दावा नारायणसामी यांनी केला आहे.