
सामना ऑनलाईन । लखनौ
काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपाने त्यांना लखनौ मतदारसंघातून केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीची लगेच घोषणा समाजवादी पक्षाने केली.
समाजवादी पक्ष़ाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते रविदार मेहरोत्रा यांनी पूनम सिन्हा यांची उमेदवारी जाहीर केली.


























































