
पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. शहा हे गोव्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान एका सभेत बोलत असताना त्यांनी हे विधान केले. गोव्यामध्ये राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. शहा म्हणाले की “कित्येक वर्ष दहशतवादी देशाच्या सीमा ओलांडून हिंदुस्थानात यायचे, दहशतवाद पसरवायचे आणि दिल्ली दरबारातून एका निवेदनापलिकडे काहीही व्हायचे नाही. पूंछमध्ये हल्ला करण्यात आला, आपले जवान जाळण्यात आले त्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वात सीमांचे संरक्षण करत सार्वभौमत्वाचा गौरव प्रस्थापित केला. एक काळ होता जेव्हा शब्दाने उत्तर दिले जात होते, मात्र आज समोरून जसा प्रश्न येईल तसेच उत्तर दिले जाते. “
#WATCH | “Another important step was surgical strike under PM Modi & former Defence Minister Manohar Parrikar. We sent out a message that one should not disrupt India’s borders…There was a time when talks happened, but now is the time to reciprocate,” says Home Min Amit Shah pic.twitter.com/BrMFUfzLRT
— ANI (@ANI) October 14, 2021





























































