‘पूर्णब्रह्म’च्या बिझनेस फेअरमध्ये मिळणार यशस्वी उद्योगाचा कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योग क्षेत्रात आपले नाव कसे यशाच्या शिखरावर घेऊन जायचे, आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहचवायचे, ग्राहकांची पसंती कशी मिळवायची अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांबरोबरच यशस्वी उद्योग कसा करायचा याचा कानमंत्र उद्योग–व्यवसाय करणार्‍यांना मिळणार आहे. उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी मनस्विनी फूडस् आणि महाराष्ट्रीयन पदार्थांची चव सातासमुद्रापार नेणार्‍या जयंती कठाळे यांच्या वतीने मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी पूर्णह्म बिझनेस फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

समाजातील अनेक व्यक्ती घरगुती उद्योग करतात. गृहिणी एकत्र येऊन खाद्यपदार्थ तयार करतात. त्याला बाजारपेठ कशी मिळवायची, पूर्णब्रह्मची फ्रेंचायजी कशी मिळवायची, तेथील नोकरीच्या संधी याबाबत पूर्णब्रह्मच्या संचालिका जयंती कठाळे या मार्गदर्शन करणार आहेत, तर कंपनीची नोंदणी, लायसन्स आदीबाबत कंपलायन्स एक्सपर्ट विद्या जोगळेकर, मनस्विनी फूडस्च्या  अर्चना भिडे मार्गदर्शन करणार आहेत. मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने सूत्रसंचालन करणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन मिती एंटरटेन्मेंट करत आहे. या पूर्णब्रह्म फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी 9930115759 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.