…अशी वाढली वेबसिरीजची लोकप्रियता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आजच्या जगात मनोरंजनाची अमर्याद साधने उपलब्ध आहेत. त्यात आता वेबसिरीजचीही भर पडली आहे. काही वर्षातच वेबसिरीजची लोकप्रियाता वाढल्याने वेबसिरीज आता सिनेमाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काळानुसार मनोरंजनाच्या संकल्पना बदलत आहेत. रेडियोवरील गाणी, टीव्हीवरील कार्यक्रम, टेपरेर्कॉडर ही साधने आता मागे पडली असून मोबाईल गेमसोबत वेबसिरीजची क्रेझ तरुणांमध्ये वाढत आहे. त्यात सर्वत्र वेबसिरीजची चर्चा होताना दिसते. नुकताच सेक्रेट गेम-2 चा ट्रेलर लाँच झाला. या सिरीजच्या पहिल्या भागाला प्रचंड लोकप्रिया मिळाली होती. त्यामुळे या सिरीजच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा शिगेला पोहचली होती. आता त्याचा दुसऱा भाग 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याने त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. त्याचदिवशी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’,जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दिग्गज कलाकर असलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या वेबसिरीजचा त्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2014 मध्ये परमनेंट रूममेट्स ही पहिली वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. त्यानंतर वेबसिरीज लोकांच्या पसंतीस यायला लागल्या. बाद बेक्ड, टीवीएफ पिचर्स, मैन्स वर्ल्ड, बैंड बाजा बारात, आएशा, टीवीएफ बैचलर्स, टीवीएफ ट्रिपलिंग, सेक्रेड गेम्स, मिर्जापुर आणि होस्टेजसारख्या वेब सीरीज लोकप्रिय झाल्या. यु ट्युब पासून सुरूवात झालेल्या या वेब सिरीजचा प्रेक्षकवर्ग वाढल्याने विविध वेबसिरीज पाहण्यासाठी वेगवेगळे अॅपही आले. सिनेमा आणि डेली सोप मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना वेब सिरीजने मनोरंजनाचे वेगळे दालन खुले केले. वेबसिरीजमुळे अनेक नवीन चेहऱ्यांना संधीही मिळाल्या. तसेच अनेक लोकप्रिय कलाकारही सिनेमाऐवजी वेबसिरीजकडे वळू लागले.

मात्र, काही वेबसिरीजमध्ये अश्लील भाषा, अर्वाच्य भाषा, शिवीगाळ आणि हिंसाचार असल्याने कुटुंबासोबत या बघता येत नाहीत. मात्र, मनोरंजन क्षेत्रात नवा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रेक्षकांची याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे या वेबसिरीज सिनेमाला कशी टक्कर देणार याबाबतची चर्चा मनोरंजन वतुर्ळात सुरू आहे.