
इंटरनेटवर अश्लील विडिओ प्रकरणी सात ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रॉडक्शन हाऊस विरोधात महाराष्ट्र सायबरने गुन्हा दाखल केला आहे. त्या सर्वाना महाराष्ट्र सायबरने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
महिलाना अश्लील व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी नुकतीच एकाला अटक केली होती. त्यानंतर एका एनजीओने महाराष्ट्र सायबरकडे तक्रार केली. त्या तक्रारीची महाराष्ट्र सायबरने गंभीर दाखल घेतली. महिलांचे अश्लील व्हिडीओ वेबसाईड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र सायबरने सात ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रॉडक्शन हाऊस विरोधात भादंवि कलम 292, 67 (अ ) माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले. सात ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती महाराष्ट्र सायबरला मिळाली आहे. त्या सात प्लॅटफॉर्म विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

























































