Porsche Macan EV – 21 मिनिटात चार्ज होणार, 613 किलोमीटर धावणार; दमदार एसयूव्ही लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. वाढती मागणी लक्षात घेता आता जर्मनीतील प्रमुख लक्झरी कार उत्पादक कंपनी Porsche ने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Porsche Macan हिंदुस्थानी बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

ही इलेक्ट्रिक SUV एकूण दोन व्हेरियंटमध्ये येते. परंतु कंपनीने फक्त Macan Turbo हा एकच व्हेरिएंट हिंदुस्थानी बाजारात उतरवला आहे. आकर्षक आणि आलिशान अशा या SUV ची सुरुवातीची किंमत 1.65 कोटी रुपये इतकी असणार आहे.

Porsche Macan turbo Electric SUV

Porsche ने लॉन्च केलेली ही SUV इतर पोर्श कार प्रमाणेच लक्झरी सुविधांसह बाजारात उपलब्ध असणार आहे. या कारचे डिझाईनदेखील अतिशय उत्तम आहे. कारच्या मागील बाजूला एलईडी टेललाईट देण्यात आली आहे. याशिवाय मागील बाजूला तुम्हाला PORSCHE चा एक थ्रीडी लोगोही पाहायला मिळणार आहे.

Porsche Macan EV

 

Macan EV मध्ये तीन स्क्रीन देखील दिलेल्या आहेत. यामध्ये एक 12.6-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि समोरच्या प्रवाशांसाठी पर्यायी 10.9-इंच स्क्रीन याचा समावेश असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार प्रीमियम प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक (PPE) आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म ऑडी Q6 ई-ट्रॉन आणि केयेन इलेक्ट्रिक सारख्या आगामी वाहनांसाठी देखील वापरता येणार आहे.

Porsche Macan EV gets this much horsepower electric motors: Here are the  details | Mint

पावर आणि परफॉर्मन्स

Porsche Macan या कारच्या इलेक्ट्रॉनिक मोटर 402 bhp ची मजबूत पावर आणि 650 Nm टॉर्क जनरेट करते. Porsche कंपनीचा दाव्यानुसार ही SUV फक्त 5.2 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेगाने धावते. याचा सर्वोच्च स्पीड 220 किमी/तास इतका आहे. यात 95 kWh क्षमतेचा शक्तिशाली बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर कारला 613 ​​किमीची रेंज देतो. 270 kW DC चार्जरने बॅटरी चार्ज केल्यावर त्याची बॅटरी फक्त 21 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत या नव्या कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

Porsche's electric Macan will be the one to get