शिरूरमध्येही झळकले औरंग्याचे पोस्टर, चार अल्पवयीनांसह पाचजणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथे उरुस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकविण्याच्या घटनेपाठोपाठ कोल्हापूरमध्ये काही युवकांनी त्याच पोस्टरचे वादग्रस्त स्टेटस मोबाईलवर ठेवल्यामुळे कोल्हापूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा तणाव काहीअंशी निवळत असतानाच, आता पुणे जिह्यातील शिरूरमध्येही औरंगजेबाचे स्टेटस इन्स्टाग्रामवर ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे जिह्यात खळबळ उडाली असून, तणाव निर्माण झाला आहे.

याप्रकरणी रेहान असिफ काझी आणि इतर चार अल्पवयीन मुलांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पोपट गोपाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 5 जून ते नऊ जूनदरम्यान शिरूर शहरात रेहान काझीसह इतर चार अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडील इन्स्टाग्राम अकाउंटवर औरंगजेब याचा पह्टो असलेला व्हिडीओ आणि औरंगजेबाचे पह्टो हातामध्ये घेऊन नाचणाऱया मुलांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची स्टोरी ठेवली. औरंगजेबाच्या पह्टोला ‘बाप तो बाप रहेगा, असे बॅक ग्राउंड म्युझिक दिलेला व्हिडीओदेखील लावण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच, शिरूर पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला.