
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवई येथील आयआयटी मुंबई ही हिंदुस्थानात नंबर वन ठरली आहे. देशात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘क्यूएस’ रँकिंग नुकतीच जाहीर केली गेली. त्यात यंदा आयआयटी मुंबईने बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसला (आयआयएससी) मागे टाकून अव्वल स्थान मिळवले.
क्यूएस रँकिंगच्या ‘टॉप 10’मध्ये या वर्षी सात आयआयटी संस्थांनी जागा पटकावली आहे.
‘क्यूएस टॉप 10’मधील
आयआयटी आयआयटी मुंबई, आयआयएससी बंगळुरू, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, हैदराबाद विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी.

























































