
पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये एरोस्पेस इंजिनीयरिंगचा ऑनलाइन अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार आहे. त्यासाठी इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इंजिनीयरिंगच्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हे अर्ज करू शकतात. या अभ्यासक्रमात एरोस्पेस इंजिनीयरिंगची ओळख करून दिली जाणार आह. हा अभ्यासक्रम बारा आठवडय़ांचा आहे. अभ्यासक्रमात 20 व्याख्यानांचा समावेश आहे. प्रा. राजकुमार पंत हे हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत. 26 जुलै रोजी सुरू होणारा हा अभ्यासक्रम 15 ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्यानंतर 24 ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फक्त एक हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना आयआयटीकडून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.



























































