प्रबोधनकारांना अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी, साहित्यिक, झुंजार पत्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधनाकांराना यावेळी अभिवादन करण्यात आले.

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी आमदार व महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव माने यांनी याप्रसंगी प्रबोधनकारांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमास महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव माने यांच्यासह खजिनदार प्रमोद माने, सचिव दिलीप शिंदे, मुख्याध्यापिका वीणा देणवलकर, स्वाती होलमुखे, मनोहर जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य कमलेश सोनपसारे आदी उपस्थित होते. तर मुंबई महानगरपालिकेतही महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिवादन केले.

राजधानीतही अभिवादन

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचम केंद्रातही प्रबोधनकारांची जयंती साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कैलास खेर फाऊंडेशन यांच्या वतीने लोणावळा परिसरात अन्नधान्य व कोरोनील किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुण्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग दस्तुरी पेंद्र जगदीश परदेशी, डॉक्टर गाडेकर, रोहित पांढरे, रवी हिरवे उपस्थित होते. याप्रसंगी खेर फाऊंडेशनच्या वतीने गिरीश चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कांदिवली येथील प्रबोधनकार ठाकरे चौकात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, विभाग संघटक मनाली चौकीदार, उपविभागप्रमुख राजन निकम, शाखाप्रमुख निखिल गुडेकर उपस्थित होते.