Lok Sabha 2019 भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमधील भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नसून त्या अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात प्रज्ञा ठाकूर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र सारख्या नावांमुळे मतदारांची गफलत होईल व मतदार चुकून साध्वींना मत देण्याऐवजी प्रज्ञा ठाकूर यांना मतदान करतील अशी शंका भाजपला आली होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रज्ञा ठाकूर यांची भेट घेत त्यांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची विनंती केली. साध्वींच्या विनंतीवर प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रज्ञा ठाकूर यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.