
टाटा स्टील मास्टर्स इव्हेण्टंमध्ये हिंदुस्थानचा ग्रॅण्ड मास्टर आर.प्रज्ञानंदने शानदार खेळी करत जगज्जेत्या डिंग लिरेनला हरवले आहे. त्याला प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत हरवले आहे. त्याने या विजयाबरोबरच लाईव्ह रेटींगमध्ये विश्वनाथन आनंद यांनाही मागे टाकले आहे. आता तो नंबर 1 हिंदुस्थानी ग्रॅण्ड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्यावर्षीही याच इव्हेण्टमध्ये डिंगला हरवले होते.
प्रज्ञानंद याच्या विजयासोबत विश्ननाथन आनंद यांच्या रेटींगमध्ये मागे सोडले आहे. प्रज्ञानंद याने एफआयडीईच्या लाईव्ह रेटींग मध्ये 11 व्या नंबरवर पोहोचला आहे. त्याच्याजवळ 2748.3 पॉईण्ट्स आहेत. विश्वनाथन आनंद 12व्या नंबरवर आहे. त्यांना एका आकड्याने मागे टाकले आहे. आनंद याच्याजवळ 2748.0 पॉईण्ट्स आहेत. या लिस्टमध्ये मॅग्नस कार्लसन टॉप वर आहे. वही फॅबियानो कारुआना दुसऱ्या नंबरवर आहे.
प्रज्ञानंद याच्या नावावर अनेक रेकॉर्ड जमा आहेत. तो 2016 साली युवा इंटननॅशनल मास्टर बनला. त्याने अवघ्या 10 वर्ष 10 महिन्याचा असताना यश मिळवले आहे. पहिल्यांदा 2017 मध्ये ग्रॅण्ड मास्टर बनला होता. त्यानंतर 2018 साली प्रगनानंद अमेरीकेच्या ग्रॅण्डमास्टर फॅबियानो कारुआनालाही हरवले आहे, त्याने ऑगस्ट 2023मध्ये चेस वर्ल्ड कप टुर्नामेण्टच्या उपांत्य फेरीच्या टायब्रेकमध्ये कारुआना याला हरवले होते.याआधी विश्वनाथ आनंदने ही कमाल केली आहे,. तर प्रगनानंदने अंतिम फेरित मॅग्सन कार्लसनलाही हरवले होते. प्रज्ञानंद तामिळनाडूच्या चेन्नई येथील आहे. त्याचा जन्म 2005 साली झाला होता. त्याचे वडिल रमेशबाबू एका बॅंकेत ब्रान्च मॅनेजरच्या पदावर आहेत.
























































