
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅंडलवरुन काही फोटो शेअर केलेले. या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. तिनं पारंपरिक साज केला आहे. तर, तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे. त्यासोबतच #ठरलं… असं हॅशटॅग प्राजक्ताने पोस्टमध्ये दिला आहे. प्राजक्ताने लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.