
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.
मंगळवारी दुपारी प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले. दोन्ही नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने भेटायला आलो. 26 तारखेला धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले. आमची आंदोलने शांततेतच होतात असे सांगितले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट
26 तारखेला धरणे आंदोलन
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 26 डिसेंबर रोजी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. दादर टीटी येथे हे धरणे आंदोलन होणार आहे. त्याबाबत या भेटीत चर्चा करण्यात आली.





























































