भाजपचे आंदोलन मंदिरासाठी नाही तर सत्तेचे दार उघडण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prakash-ambedkar

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपचे ‘दार उघड’ हे आंदोलन मंदिरांसाठी नाही, तर सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हा संपूर्ण खटाटोप असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज करण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे अजून घडण्यात आलेली नाहीत. पण धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यात विविध ठिकाणी ‘दार उघड’ हे आंदोलन पुकारत विविध मंदिरांच्या बाहेर घंटानाद केला. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी केली आहे. विठ्ठल मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर आधी चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील नंतर वारकऱ्यांसोबत विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याची घोषणा आघाडीने केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांना राज्यातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केला आहे.