
सामना ऑनलाईन, सोलापूर
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूरचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे सोलापुरातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली आहे. इतकेच नाही तर एकीकडे संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतप्त भावना असताना गायकवाड यांनी सोलापुरातील नई जिंदगी हा भाग मिनी पाकिस्तान असल्याचे म्हटले. याच भागामध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत गायकवाड यांनी नेमके काय म्हटले ते तुम्हीही पाहा आणि ऐका































































