
रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ येथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
प्रमोद घोसाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अधिक खिळखिळी झाली आहे. तर कोकण विभागात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.



























































