‘ज्युनियर मुंबई श्री’वर प्रणव खातूचे नाव; दिव्यांगांच्या गटात नितेश भंडारी, महबूब शेख अव्वल

मुंबईतील शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या 250 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेल्या ‘ज्युनियर मुंबई श्री’ स्पर्धेत यंग दत्ताराम व्यायामशाळेच्या प्रणव खातूने बाजी मारली. ‘दिव्यांगांच्या मुंबई श्री’ स्पर्धेत नितेश भंडारी आणि महबूब शेख अव्वल ठरले तर ‘ज्युनियर मेन्स फिजिक’ प्रकारात प्रतिक साळवी आणि आनंद यादव यांनी यश संपादले. ‘मास्टर्स मुंबई श्री’ स्पर्धेत सतीश पुजारी (70 किलो), जगदीश कावणकर (70 किलोवरील) आणि शशिकांत जगदाळे ( 50 वर्षावरील) यांनी सोनेरी यश संपादले.

कांदिवली पश्चिमेला बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना आयोजित दोन लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली. ‘ज्युनियर मुंबई श्री’च नव्हे तर फिजिक प्रकारात खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विस्फारणारा होता. तसेच ‘दिव्यांग मुंबई श्री’ आणि मास्टर्स मुंबई श्रीलाही मोठया संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्वच गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर,विट्टी फणसेका, राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्युनियर मुंबई श्रीचा निकाल
55 किलो वजनी गट -1. ऋषिराज दुबे (बोवलेकर जिम), 2. दीपेश आरडे (बोवलेकर जिम), 3. दर्शन सावंत (द फ्लेक्स).

60 किलो- 1. प्रतीक साळवी (माँसाहेब जिम ), 2. ओंकार भानसे (शिवाजी जिम), 3. सिद्धेश सुर्वे (परब फिटनेस).

  65 किलो- 1. वेदांत शेलार (बाळ मित्र जिम), 2. शिवा चौरिया (माँसाहेब जिम), 3. आदित्य पाटील (लोखंडे फिटनेस).

70 किलो -1. सूरज यादव (शिवाजी जिम), 2. आनंद यादव (युमिनिया जिम), 3. ओम वाडेकर (रिफ्युल जिम).

 75 किलो -1. अंबाजी बोडेकर (माँसाहेब जिम) , 2. नवनाथ कामटे (सर्वेश्वर फिटनेस), 3. रेहान सय्यद (ओम साई फिटनेस).

75 किलोवरील -1. प्रणव खातू (यंग दत्ताराम व्या. शाळा), 2. ओंकार सुर्वे (अल्टीमेट जिम), 3. आयुष्य तांडेल (परब फिटनेस).