पुस्तकवेडा ग्रंथपाल! शालेय ग्रंथालयासाठी जमवली 25 लाखांची पुस्तके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाचून झाल्यावर आपल्याजवळील पुस्तकाचं करायचं काय, असा प्रश्न पडतो. अनेकांच्या या प्रश्नावर तोडगा काढलाय तो पुण्यातील आबासाहेब अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी. शाळेतील ग्रंथालयाला पुस्तकांसाठी निधी मिळत नसल्याने गेल्या 24 वर्षांपासून ते लोकांना पुस्तक भेट देण्याचे आवाहन करतायत. आजवर सुमारे 25 लाख रुपयांची 20 हजाराहूनो पुस्तकं त्यांनी या उपक्रमा अंतर्गत जमवली आहेत. त्यातील 12 लाख रुपयांची पुस्तपं इतर ग्रंथालयांना पुनर्भेट म्हणून दिली आहेत.

वाचनाच्या आवडीपोटी प्रसाद भडसावळे यांनी अल्फा लावल या कंपनीतील नोकरी सोडली. 1997 पासून ते पुण्यातील आबासाहेब अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथपाल व संदर्भतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही हे वर्षभरात त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शाळेवर कोणताही आर्थिक भार न टाकता ग्रंथालयासाठी पुस्तक जमा करण्याचे त्यांनी ठरवले. सुरुवातीला त्यांनी साहित्यिक आणि मराठी कलाकारांना पुस्तके भेट म्हणून देण्याचे आवाहन केले.

याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना भडसावळे म्हणाले, ‘सर्वसामान्य वाचकांकडेही खूप पुस्तकं असतात; परंतु वाचून झाल्यावर ती पुस्तकं भेट म्हणून देण्याची त्यांची मानसिकता नसते. मराठी कलाकारांकडे खूप पुस्तपं असतात. वाचून झालेल्या पुस्तकांचं करायचं काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यामुळे अशा कलाकारांना मी पुस्तक भेट म्हणून देण्याचे आवाहन केले. एखाद्या कलाकाराने पुस्तक ग्रंथालयाला भेट म्हणून दिले असेल तर पुतूहल म्हणून वाचक आवर्जून ते पुस्तक वाचतात. केवळ वाचन संस्पृती वाढावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे. इतपंच नाही तर त्यांनी आपले शालेय ग्रंथालय सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.

पुस्तकासोबत सकारात्मक विचार

भडसावळे पुस्तकांसोबत सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचवतात. याबाबत ते म्हणाले, ‘‘कलाकारांना विविध कार्यक्रमात पुस्तपं भेट स्वरूपात मिळतात. वाचून झाल्यावर ती पुस्तपं ते आम्हाला देतात. त्यावर कलाकार आणि भेट देणाऱयाचे नाव असते. हे नाव व्हाईटनरने मिटवण्यापेक्षा आम्ही त्यावर स्टिकर चिकटवतो. पुस्तकांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व यावर 125हून अधिक दिग्गजांनी स्वतŠच्या हस्ताक्षरात स्टिकरवर खास संदेश लिहिले आहेत. त्यामुळे तरी लोकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल, हा त्यामागचा उद्देश आहे.’’

इतर ग्रंथालयांनाही केली मदत

आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी उपयोगी नाहीत किंवा रिपीट आहेत अशी पुस्तकं ते राज्यातील इतर ग्रंथालयांना किंवा जिथे त्याचा योग्य उपयोग होईल अशा ठिकाणी देतात. उदाहरणार्थ, नाटकांच्या स्क्रिप्ट ते ललित कला केंद्राला देतात तर गिरीश कर्नाड यांनी दिलेली कानडी पुस्तकं त्यांनी कर्नाटक संघाला पुनर्भेट म्हणून दिली आहेत. आजवर सुमारे बारा लाख रुपयांची पुस्तके महाराष्ट्रातील विविध ग्रंथालयांना भेट म्हणून दिली आहेत.

घरोघरी असावी ग्रंथसंपदा!

कोरोना काळात ‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सात हजार पुस्तकांचे वाटप त्यांनी केले आहे. तसेच त्यांच्या यू-टय़ूब चॅनेलवर ‘रोज एक बोधकथा’ हा उपक्रम सुरू आहे. नुकताच त्यांनी 300 बोधकथांचा टप्पा पार केला आहे.

मराठी कलाकार, साहित्यिक सरसावले

या उपक्रमासाठी पुस्तके भेट देणाऱया देणगीदारांची संख्या 1200हून अधिक आहे. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सुनीताबाई देशपांडे, विजय तेंडुलकर, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, चिन्मय मांडलेकर, तेजश्री प्रधान आदींनी पुस्तकांच्या रुपात मदत केली आहे. काहींनी पुस्तकांसाठी निधी दिला आहे. सुधीर मोघे यांनी तब्बल दीड लाख रुपयांची पुस्तके भेट दिली.