
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते प्रसाद खांडेकर आता ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे असून प्रमुख भूमिकेतही दिसणार आहेत.
‘कुर्रर्रर्रर्र’ म्हणजे काय? किंवा या नावाचा अर्थ काय? हा प्रश्न रसिकांना पडला असेलच. याचा उलगडा नंतर होईलच. मात्र हे नाटक सत्य घटनेवर आधारित असून आई–वडील, मुलगी आणि जावई यांच्याभोवती फिरणारं हलकं फुलकं कॉमेडी नाटक आहे.
हास्यजत्रेत धुमाकूळ घालणारा प्रसाद आता रंगभूमीवर काय जादू करणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ‘प्रग्यास क्रिएशन्स’ आणि ‘व्ही. आर. प्रॉडक्शन्स’ या नाटय़संस्थेच्या माध्यमातून हे नाटक एप्रिलमध्ये रंगभूमीवर येत आहे.




























































